Read Aloud the Text Content
This audio was created by Woord's Text to Speech service by content creators from all around the world.
Text Content or SSML code:
सोडून द्यावं... Leave it yaar. एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं मोजक्याच लोकांशीच ऋणानुबंध जुळतात, एखाद्याशी न पटले तर बिघडले कुठे सोडून द्यावं एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं सोडून द्यावं आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं सोडून द्यावं आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्या नंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं सोडून द्यावं समजल तर ठीक नाहितर हे ही सोडून द्यावं